सोशल मीडियावरील आर्थिक सल्ल्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी ७ गोष्टी तपासा.

सोशल मीडियावरील आर्थिक सल्ला योग्य आहे की नाही हे कसे तपासावे? गुंतवणूक करण्यापूर्वी या ७ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

FINANCIAL LITERACY

Econowise marathi ✍️

7/28/20261 min read

आज सोशल मीडिया हे आर्थिक माहिती मिळवण्याचे एक महत्वाचे माध्यम बनले आहे. Instagram, Youtube, Facebook आणि इतर प्लॅटफॉर्मवर  शेयर बाजार, म्यूचूअल फंड, ट्रेडिंग, आणि वैयक्तिक आर्थिक नियोजनाबद्दल, मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. मात्र, इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक आर्थिक माहिती योग्य किंवा विश्वासार्ह असेलच असे नाही. त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी माहितीची सत्यता तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.

१. माहिती देणारी व्यक्ती कोण आहे?

एखादी व्यक्ती आर्थिक सल्ला देत असेल, तर तिची पार्श्वभूमी आणि पात्रता तपासा. ती व्यक्ती फक्त अनुभवाच्या आधारावर बोलत आहे की तिच्याकडे संबंधित व्यावसायिक पात्रता आहे, हे समजून घ्या.

२. " हमीचा नफा" सांगितला जातोय का?

"100% नफा", "हमीचा परतावा" किंवा "काहीही जोखीम नाही" अशा दाव्यांपासून सावध रहा. गुंतवणुकीमध्ये परतावा आणि जोखीम यांचा संबंध असतो. त्यामुळे मोठा नफा आणि शून्य जोखीम यांचे आकर्षक वचन संशयास्पद असू शकते.

३. माहितीचा स्रोत तपासा. 

कोणतीही आर्थिक बातमी किंवा दावा पाहिल्यानंतर त्याचा मूळ स्रोत शोधा. सरकारी संस्था, नियामक संस्था, कंपनीचे अधिकृत निवेदन किंवा विश्वासार्ह वृत्तसंस्था यांसारख्या स्त्रोतांवरून माहिती पडताळणे अधिक सुरक्षित ठरते.

४. फक्त सोशल मीडिया पोस्टवरून गुंतवणूक करू नका.

एखाद्या Reel किंवा Short मध्ये एखादा शेअर वाढेल असे सांगितले म्हणून लगेच गुंतवणूक करणे योग्य नाही. कंपनीचा व्यवसाय, आर्थिक कामगिरी, मूल्यांकन, जोखीम आणि तुमची स्वतःची आर्थिक उद्दिष्टे यांचा विचार करणे आवश्यक आहे.

५. "जलद श्रीमंत व्हा" या मानसिकतेपासून सावध रहा.

पैसे कमावण्यासाठी शॉर्टकट शोधणे स्वाभाविक आहे. पण आर्थिक क्षेत्रात जलद आणि हमखास श्रीमंतीचे दावे अनेकदा दिशाभूल करणारे असू शकतात. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी आर्थिक शिस्त, बचत, योग्य नियोजन आणि संयम महत्त्वाचे असतात.

६. तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा.

इतर व्यक्तीने एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवला म्हणून ती गुंतवणूक तुमच्यासाठीही योग्य असेल असे नाही. तुमचे उत्पन्न, खर्च,आपत्कालीन निधी, कर्ज, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन निर्णय घ्या.

७. माहिती समजली नसेल तर गुंतवणूक करू नका.

तुम्ही ज्या आर्थिक उत्पादनात पैसे गुंतवत आहात ते कसे काम करते, त्यातील जोखीम काय आहे आणि पैसे कसे मिळतील के समजत नसेल, तर आधी त्याबद्दल शिका.

समजून घेतलेली गुंतवणूक ही अंधानुकरणापेक्षा नेहमीच चांगली असते.

निष्कर्ष 

सोशल मीडिया आर्थिक शिक्षणासाठी उपयुक्त साधन ठरू शकते. मात्र, प्रत्येक माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही.

माहिती घ्या- स्त्रोत तपास- जोखीम समजा- स्वतःचा विचार करा- मगच निर्णय घ्या.

आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात मोठ्या पैशांपासून होत नाही; ती योग्य आर्थिक ज्ञान आणि शिस्तबद्ध निर्णयांपासून होते.

टिप :- हा लेख केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने लिहिला आहे.हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक किंवा आर्थिक सल्ला नाही. 

सोप्या मराठीत आर्थिक साक्षरतेकडे तुमचे पहिले पाऊल.

"आमच्या सोबत जोडा"

"महत्वाची पाने"